Madan lal dhingra images of love

मदनलाल धिंग्रा

जन्म १८८७.. फाशी १७ ऑगष्ट १९०९

“माझा असा विश्वास आहे कि, परकीय संगिनिच्या सहाय्याने परदास्यात जखडलेले राष्ट्र हे नित्य युद्धमानच राष्ट्र असते.नि:शस्त्र जमातीला उघड उघड युद्ध करणे हे अश्यक्य होत असल्यामुळे धिंग्राने दबा धरून हल्ला चढविला.,त्याला बंदुक मिळू शकली नाही.

म्हणून मदनलालने पिस्तुल बाहेर काढले आणि ते झाडले.!”

असे नि:संदिग्ध वक्तव्य फाशी पूर्वी करणारे मदनलाल धिंग्रा हे थोर क्रांतिकारक होते. भारतमातेविषयी जाज्ज्वल्य निष्ठा बाळगणार्या या वीराचा जन्म पंजाब मध्ये १८८७ साली झाला. त्यांचे वडील अमृतसर मध्ये सिव्हिल सर्जन होते. त्यांचे घराणे अत्यंत सुखवस्तू होते. मदनलाल २१ वर्ष्याचे असतानाच त्यांचा विवाह झाला.

त्यांना पुत्ररत्न हि झाले.पण त्यांचे संसारात मन रमेना, क्रांती काळातील अनेक घटना त्याच्या मनास बेचैन करीत होत्या. अखेर१९०६ साली त्यांनी इंग्लंड गाठले त्याठिकाणी ‘युनिव्हर्सिटी कॉलेज’ मद्ये स्थापत शास्त्राचा विद्यार्थी म्हणून तीन वर्षे त्यांनी नाव कमाविले.

इंग्लंड मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सहवासात मदनलाल आले.

सावरकरांच्या क्रांती विचारांनी ते चांगलेच प्रभावित झाले. भारतमातेला बंधमुक्त करण्याच्या विषयावर ते अनेकदा सावरकरांशी गप्पा मारीत असत. अश्याच गप्पांच्या वेळी जपानी लोकांच्या शौर्याचे अनेकदा कौतुक होताना आणि हिंदुस्थानी वीरांचा तिरस्काराने उल्लेख होताना पाहून मदनलाल भडकले. ते म्हणाले, “त्यात विशेष काहीच नाही.!

माझे हिंदू राष्ट्र हि तितकेच शूर आणि साहसी आहे.लवकरच आमच्या कीर्तीचे पोवाडे पण तुम्ही गाऊ लागाल, ” यावर प्रतिस्पर्ध्याने हा पोकळ डौल आहे असे म्हटले, मदनलालने त्वरित त्याला प्रचीती पाहण्याचे आव्हान केले. त्यांनी एक टोकदार टाचणी घेतली. आपल्या हाताच्या तळव्यावर खुपसून ती दुसर्या बाजूने बाहेर काढून दाखविली.

हात रक्त बंबाल झाला……..पण त्यांनी हुं कि चूं  केले नाही !

एकदा इंडिया मध्ये रासायनिक प्रात्यक्षिक चालले होते. भांड्यात रसायन उकळत होते. क्षणाधार्त ते भांडे खाली उतरविणे आवश्यक होते. अन्यथा स्पोटाची शक्यता होती. सावरकर मदनलालकडे पाहात होते.त्यांनी अडचण सांगताच मदनलालने निर्धाराने ते भांडे खाली उतरविले. रसरसीत लाल झालेल्या त्या भांड्याने धिंग्राच्या हाताचे चामडे सोलून निधाले………सावरकर या महान तरुणाकडे, व त्याच्या साहसाकडे पाहातच राहिले.

साहस हा धिंग्राचा अंगभूत गुण होता. २५ जानेवारी १९०९ त्यांना रिव्हाल्व्हरची परवानगी मिळाली. त्यांनी एका माणसा कडून तीन पाउंड पाच शिलिंगला एक स्वयंचलित रिव्हाल्व्ह्र विकत घेतली. नेमबाजीचा सराव केला. हिंदुस्थानातील जनतेवर ब्रीटीशांकडून होणार्या अन्यायाचा प्रतिशोध घ्यायचा म्हणून तर ते जास्तच आसुसले होते. कर्झन वायली या ब्रिटीश अधिकार्या कडे त्यांचे लक्ष होते.

कारण भारत आणि इंग्लंड मध्ये असणार्या क्रांतिकारका वरील त्यांची दडपशाही दिवसेंदिवस वाढतच होती. त्यांचा धिंग्रांना काटा काढायचा होता.

अखेर तो दिवस उजाडला १जुलै १९०९ हा तो दिवस होता. न्याशनल इंडियन असोशीएशनच्या मेळाव्यात लंडन मुक्कामी असलेल्या धिंग्रांनी कर्झन वायली वर ग्लीबार केला. वायली यमसदनाला गेला. पण वायलीचा कळवला बाळगणारे मुळचे मुंबईचे असलेले डॉ.

कावसलाल काका हे आडवे झाले. धिंगराने एक गोळी त्यांच्या वरही चालविली. आणि भारतमातेच्या या शत्रूचा पण नायनाट केला. त्या वेळी रात्रीचे ११ वाजून १० मिनिटे झाली होती.

या खळबळजनक प्रकारा नंतर धिंग्रांणा अटक झाली. त्यांना वाल्टन स्ट्रीट पोलिस ठाण्यावर नेण्यात आले. २ जुलैला हि बातमी सर्वत्र पसरली. आणि हिंदुस्थान हा तेजस्वी क्रांतीकारींचा देश आहे, हे सिद्ध झाले.

पण धिंग्रांना फाशीची शिक्ष्या द्यायचे हि याच वेळी ठरले. कारागृहात त्यांना भेटायला अनेक लोक उत्सुक होते. कधी क्रांती- कारकांना संधी मिळायची, कधी नाही, एकदा ग्यानचद्र वर्मा धिंग्रानां भेटायला गेले होते . तेव्हा ते म्हणाले , “मदनलाल , मी तुझ्यासाठी काय करू ? ”
“आता काही दिवसात फासी होणारच आहे, भारतमातेचा चरणी प्राण अर्पण करतांना कसे नीटनेटके जायला हवे नाही !

पण चांगला पोशाख करण्यासाठी इथे अरे साधा आरसाही नाही. एक छानदार आरसा दे ना पाठवून !”

हे ऐकून ग्यानचद्र वर्मा शहारलेच. मृत्यूचे अक्राळ विक्राळ रूप समोर उभे असतांनाही किती अविचल आहे हा! १७ ऑगस्ट १९०९ रोजी तो दुर्दैवी दिवस उजाडला . लंडनच्या पेटनव्हील तुरुंगात मदनलालला फासी . आली  या बातमीने स्वातंत्र आंदोलनाने पुन्हा पेट घेतला. अनेक ब्रिटीश अधिकारी त्यात मृत्युमुखी पडले.

धिंग्राच्या बलिदानाचे फलक सर्वत्र लागले आणि ह्जार्रो तरूण मुले या क्रांतिकुंडात  समिधा बनायला सिद्ध झाली.

आपल्या मृत्यूनंतर हिंदूपद्धतीने आपल्यावर अंत्यसंस्कार व्हावेत अशी धिंग्रांची इच्छा होती . पण क्रूर ब्रिटिशांनी त्यांची ती इच्छा पूर्ण होऊ दिली नाही. त्यांच्या मृत्यूनंतर ६७ वर्षांनी त्यांची शवपेटी विमानाने हिंदुस्तानात आणली. २५ डिसेंबर १९७६ला लाखो लोकांच्या उपस्तीतीत हरिद्वार येथे त्यांच्या अस्थिचे विसर्जन करण्यात आले.

कोणतीही राष्ट्रे जिवंत राहतात, ती अशा बलिदान करणार्याच्या अखंड स्मृतीनेच होय.

मदनलाल धिंग्राच्या बलीदानाबद्दल मी एवढच म्हणेन –
                                                                        यज्ञी ज्यांनी देऊनी नीज शीर
                                                                        घडिले भारत वैभव मंदिर
                                                                        परी जयांच्या बलीवेदीवर
                                                                        नाही चिरा, नाही पणती
                                                                        तेथे कर माझे जुळती .

Original Pictures of Madan Lal Dhingra :